दोन हजारांची नोट बंद होणार नाही, लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून २ हजारांची नोट बंद केली जाणार अशा काही चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सगळ्या चर्चांना काहीही अर्थ नाही असे RBI ने म्हटले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत २ हजारांची नोट बंद होणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

दोन हजारांची नोट बंद केली जाणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात येत होती. सरकारतर्फे लवकरच या संदर्भातली घोषणा केली जाईल असेही काही ठिकाणी सांगण्यात आले. तसेच आरबीआयने अनेक अधिकाऱ्यांना दिलेली सुट्टी रद्द केली आहे त्यामागेही हेच कारण असल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र या सगळ्याचा २ हजाराची नोट बंद करण्याशी काहीही संबंध नाही असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. २ हजाराची नोट बंद होणार नाही लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.