News Flash

RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

विरल आचार्य यांनी त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच आपले पद सोडले आहे

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विरल आचार्य यांनी त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच आपले पद सोडले आहे. विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. २३ जानेवारी २०१७ ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच त्यांनी पद सोडले आहे.

याआधी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर महिन्यात काही खासगी कारणांमुळे राजीनामा दिला होता. विरल आचार्य यांचा समावेश आरबीआयच्या त्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये होतो जे उर्जित पटेल यांच्या टीमचे सदस्य होते. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पद सोडल्यानंतर विरल आचार्य आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या सेटर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

आधी उर्जित पटेल आणि त्यानंतर आता विरल आचार्य या दोघांनी सात महिन्यांच्या कालावधीत आरबीआयमधून आपले पद सोडले आहे. खासगी बाब असल्याचे सांगत उर्जित पटेल यांनी गव्हर्नरपद सोडले होते. आता विरल आचार्य यांनीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हे पद का सोडले याचे कारण समोर येऊ शकलेले नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 9:03 am

Web Title: rbi deputy governor viral acharya has resigned six months before the scheduled end of his term scj 81
Next Stories
1 Make In India: DRDO च्या शब्दानंतर भारताचा इस्त्रायल बरोबरचा ५० कोटी डॉलर्सचा क्षेपणास्त्र करार रद्द
2 लॉर्ड्सबाहेर पाक क्रिकेट चाहत्यांचा राडा, फाडले बलुच कार्यकर्त्यांनी लावलेले पोस्टर्स
3 विमानात झोप लागल्याने अडकून पडलेल्या बाईची गोष्ट!
Just Now!
X