भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना करोनाची लागण झाली असून त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दास यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली. या आजाराची कुठलीही लक्षणं नससल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच आयसोलेशनमधून आपण काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, “कोणतीही लक्षण नसताना माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी हे सूचित करु इच्छितो. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी रिझर्व्ह बँकेचं कामकाज हे नेहमीप्रमाणं सुरु राहणार आहे. सर्व उपगव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांसाठी मी व्हिडिओ कॉन्फरन्स आणि फोनवरुन सर्व दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे.