मागील सहा महिन्यांमध्ये चार सरकारी बँका सायबर गुन्ह्याच्या शिकार झाल्या आहेत. यामुळे आता रिझर्व्ह बँकेने बँकांच्या ऑनलाईन सुरक्षेचा पडताळा करण्यासाठी एथिकल हॅकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने एथिकल हॅकर्सची टिम तयार करण्यास सुरुवात केली आहे.

रिझर्व्ह बँक तयार करत असलेल्या टिमकडे बँकेच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी शोधण्याचे काम देण्यात येणार आहे. यानंतर बँकांच्या सुरक्षा यंत्रणेत काही त्रुटी आढळल्यास ही टिम संबंधित बँकेला त्यामध्ये दुरुस्ती करण्यास मदत करणार आहे. ‘सायबर हल्ल्यापासून स्वत:चा आणि सर्व बँकांचा बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार आहे,’ अशी माहिती या क्षेत्रातील एका सूत्राने दिली आहे. ‘रिझर्व्ह बँकेकडून सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्यासाठी एथिकल हॅकिंग, नियोजित आणि अनियोजित ऑडिट करणे अशा मार्गांचा वापर करण्यात येणार आहे. सर्व बँकांनी सायबर सुरक्षेच्या अत्याधुनिक उपायांचा अवलंब करावा, यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील असणार आहे,’ अशी माहिती वरिष्ठ पातळीवरील सूत्रांनी दिली आहे.

multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
my portfolio, small cap fund
‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४
byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल

टिममध्ये कोणाकोणाचा समावेश ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने गेल्या २ महिन्यांमध्ये एक छोटी टिम बनवली आहे. कोणत्या बँकेच्या सुरक्षा यंत्रणेत काय त्रुटी आहेत, हे या टिमचे मुख्य काम असेल. या टिममध्ये एक तरुण एथिकल हॅकर आणि काही माजी पोलीस अधिकारी असणार आहेत. याआधी रिझर्व्ह बँकेने माजी पोलीस अधिकारी आणि बँकिंग क्षेत्रातील गुन्ह्यांच्या जाणकार असलेल्या नंदकुमार सरवडे यांच्या नेतृत्वाखाली एक टिम तयार केली आहे. यासोबतच रिझर्व्ह बँकेने अनेकदा सायबर सुरक्षा यंत्रणा भक्कम करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली आहे.

एथिकल हॅकिंग म्हणजे काय ?
एथियल हॅकरचे काम हॅकरसारखा विचार करुन काम करणे असते. हॅकर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी शोधून त्यांचा गैरवापर करतात. तर एथिकल हॅकर्स सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी शोधून त्यांचा फायदा हॅकर्स उठवण्यापूर्वीच उपाययोजन करतात. थोडक्यात हॅकर्सना रोखण्याचे काम एथिकल हॅकर्स करतात. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील ५१ बँकांना एप्रिल २०१३ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत ४८५ कोटींचा फटका बसला आहे. यातील ५६ टक्के नुकसान सायबर गुह्यांमुळे बँकांना सोसावा लागला आहे.