रिझर्व्ह बँकेने आजच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला. बँकेने भलेही रेपो रेटमध्ये कपात केलेली नसली तरी सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत काही मोठे निर्णय घेतलेत. आरबीआयने एटीएमबाबत काही मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याचे व एक विशेष कार्ड लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी यासंदर्भात सूतोवाच केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शॉपिंगसाठी नवं कार्ड –
सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने विविध बँकांचे ATM बद्दलचे नियम बदलणार आहेत. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे. एटीएम मशिनमधून पैसे बाहेर पडण्याची जी प्रणाली आहे ती अधिक सक्षम बनवावी, या मशिनमध्ये वापरण्यात येणारे अॅप्लिकेशन अर्थात सॉफ्टवेअरमध्येही बदल करावेत. त्यावर सातत्याने निगराणी राखावी. महत्वाच्या डेटा सुरक्षित ठिकाणी असावा, त्यावरील प्रक्रिया आणि त्याचे हस्तांतर व्यवस्थित व्हावे असे काही मार्गदर्शक तत्वे बँकेने तयार केली आहेत.

शॉपिंगसाठी नव्या कार्डसोबतच आरबीआयने प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट (PPI) लाँच करण्याची घोषणाही केली आहे. याचा वापर 10 हजार रुपयांपर्यंतचं सामान किवा सेवा खरेदी करण्यासाठी करता येईल.आरबीआयनुसार हे कार्ड बँक अकाउंटद्वारे रिचार्ज करता येईल. याचा वापर बिल पेमेंट करण्यासह अन्य प्रकारच्या खरेदीसाठी केला जाऊ शकतो. याशिवाय पीपीआय कार्डला बँकेत रोख रक्कम भरुन देखील रिचार्ज करता येईल. तसंच, डेबिट कार्डद्वारे रिचार्जचा पर्यायही उपलब्ध असेल. एका महिन्यात कमाल 50 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. याबाबत अधिक माहिती 31 डिसेंबर 2019 पर्यंत दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi to introduce new security measures to make atms safer sas
First published on: 05-12-2019 at 19:29 IST