News Flash

आरबीआय लवकरच आणणार २० रूपयांची नवी नोट

ही नोट आधीच्या नोटेपेक्षा तुलनेने वेगळा आकार आणि डिझाइनमध्ये आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (संग्रहित छायाचित्र)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच नवीन वैशिष्ट्यांसह २० रूपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. आरबीआयनेच ही माहिती दिली आहे. २००, २००० रूपयांच्या नोटा चलनात आणण्याशिवाय १०, ५०, १०० आणि ५०० रूपयांच्या नेाटा आधीच नव्या रंगरूपात सादर करण्यात आल्या आहेत.

नोव्हेंबर २०१६ पासून नव्या रूपात महात्मा गांधी मालिके अंतर्गत या नोटा जारी करण्यात येत आहे. ही नोट आधीच्या नोटेपेक्षा तुलनेने वेगळा आकार आणि डिझाइनमध्ये आहे.

आरबीआयच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१६ पर्यंत २० रूपयांच्या नोटांची संख्या ४.९२ अब्ज होती. जी मार्च २०१८ पर्यंत १० अब्ज झाली. या चलनातील नोटांची संख्या सध्या ९.८ टक्के इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 1:58 pm

Web Title: rbi to issue new 20 rupee note very soon
Next Stories
1 नोएडात मोकळ्या जागेत नमाज पठणाला बंदी; पोलीस अधीक्षकांकडून आदेश जारी
2 इराणच्या चाबहार बंदराचे भारताकडून संचालन सुरु
3 नागरी सेवा परिक्षेसाठी वयोमर्यादा कमी होणार नाही; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे स्पष्टीकरण
Just Now!
X