News Flash

Kerala Floods: गच्चीवर उतरवलं हेलीकॉप्टर, नौदलाची मदतीची शर्थ

केरळमध्ये पावसानं व पुरानं थैमान घातलं असून अशा आपत्कालीन स्थितीत खरे हीरो कोण हे ही समोर येत आहे

सौजन्य श्रेया धोंडियाल यांचं ट्विटर खातं @shreyadhoundial

केरळमध्ये पावसानं व पुरानं थैमान घातलं असून अशा आपत्कालीन स्थितीत खरे हीरो कोण हे ही समोर येत आहे. सगळीकडे पाणीच पाणी असताना नौदलाच्या हेलीकॉप्टर्सना मदत करण्यासाठी देखील जमीन दिसत नाही अशी स्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीत नौदलाच्या जवानांनी इमारतीच्या गच्चीवर हेलीकॉप्टर उतरवलं आणि पुरामध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली असे दृष्य दिसत आहे.

खालील फोटोमध्ये आहेत कॅप्टन राजकुमार. यांनी झाडांमधून वाट काढत हेलीकॉप्टर असं चालवलं की त्या मशिनची जणू परीक्षाच आहे. अशा स्थितीत त्यांनी तब्बल ३२ जणांचे प्राण वाचवले.

पुढील फोटो आहे विजय वर्मा यांचा. यांनी साजिथा या गर्भवतीचे प्राण काल वाचवले. साजिथा यांची सुटका केल्यानंतर लगेचच त्या प्रसूत झाल्या असून दोघंही सुखरूप आहेत.

केरळमध्ये १४ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये पूरानं गेले आठ दिवस थैमान घातलं असून देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर लाखाच्या पुढे लोक बेघर झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले असून त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 8:58 am

Web Title: real hero of indian navy lands helicopter on terrace kerala floods
Next Stories
1 तुम्ही आता सोबत आहात, मला ठाऊक आहे; पूनम महाजन यांचे भावस्पर्शी ट्विट
2 गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकमध्ये भीषण धडक; ५ जण जागीच ठार
3 मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताने राखला १०.०८ टक्के विकास दर
Just Now!
X