गरीब आयआयटी विद्यार्थ्यांसाठी सुपर ३० या गटाची स्थापन करणारे आनंद कुमार यांनी मेंदूला चालना देणारा रिअ‍ॅलिटी शो तयार करण्याची कल्पना मांडली आहे. पण हा रिअ‍ॅलिटी शो इतर रिअ‍ॅलिटी शो सारखा नसेल. त्यांच्यासारख्या एका चांगल्या गणितज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा शो होणार आहे. गणित हा विषय त्यांचा आवडता असून ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे त्यांना वाटते. गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२७ व्या जन्मदिनानिमित्त त्यांनी सुपर ३० रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स या संस्थेच्या वतीने हा जो कार्यक्रम झाला होता त्यात त्यांनी गणिताच्या रिअ‍ॅलिटी शोची कल्पना मांडली.  हा शो करमणूक करणारा व माहितीपूर्ण राहील तसेच  गणितज्ञ रामानुजन यांचा वारसा पुढे नेणारा आहे
गणितात भारताला मोठी परंपरा आहे त्यामुळे तर्कसंगत गणिताने जग बदलता येते हे लोकांनी लक्षात घ्यावे. भारताला चांगल्या शिक्षकांची गरज असून शिक्षकांनी त्यांची कौशल्ये वाढवली पाहिजे. भारतीय व्यक्तीला फिल्ड मेडल मिळाले पाहिजे. गणित हे निसर्गाशी संबंधित असून बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, भूमिती यातील गणिती प्रश्न सोडवण्यासाठी या संकल्पना कशा वापरायच्या हे त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले आहे.
गणित हा तसा सोपा विषय आहे, पण त्यात विद्यार्थ्यांना रमवायला हवे. गणित आणि संगीताची बरोबरी केली जाते. गणिताचे आणि संगीताचे नियम काही बाबतीत सारखेच असतात. त्यामुळे गणित हीसुद्धा कलाच आहे.
गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी आयआयटी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणारा सुपर ३० हा वर्ग कुमार यांनी तयार केला असून त्याचे जगात कौतुक झाले आहे. एमआयटी व हार्वर्ड येथे त्यांनी प्रेरणादायी भाषणे दिली आहेत.
पाठांतर करून शिकण्यापेक्षा संकल्पना लक्षात घेऊन शिकण्याच्या आवश्यकतेवर आनंदकुमार यांनी भर दिला आहे. आनंद कुमार हे बिहारचे आहेत.

रिअ‍ॅलिटी शोचे फायदे
बिहारच्या सुपर ३० या आयआयटी प्रवेश परीक्षेत गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आनंद कुमार यांची गणिताच्या रिअ‍ॅलिटी शोची कल्पना विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होऊन त्यामुळे गणिताची गोडी वाढू शकते. गणितातील संकल्पना मुलांना अधिक रंजक पद्धतीने समजावता येऊ शकतात. गणिथ हा विषय मुलांच्या नावडीचा असतो पण गणिताशिवाय जीवनातील अनेक समस्या सोडवणे कठीण असते. अगदी निसर्ग व गणिताचाही संबंध असतो. त्यामुळे गणित विषयाला वळसा घालण्याऐवजी त्याला ताठ मानेने सामोरे जाण्याचा एक नवा संदेश त्यातून जाईल.