नवी दिल्ली : देशात सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये शुक्रवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२ रुपयांवर जाऊन पोहोचला. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २९ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३१ पैशांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९१.२७ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ८१.७३ रुपयांवर पोहोचला. राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२. १५ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील अनुप्पूर येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०१.८६ रुपये तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर ९९.९५ रुपये इतका झाला आहे. देशातील काही भागांत यंदा दुसºयांदा इंधनाच्या दराने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.