News Flash

इंधनाचे दर वाढले तर खर्च कमी करा, भाजपा मंत्र्याचा जनतेला सल्ला

जागतिक बाजारात जे कच्च्या तेलाचे दर असतात. त्या हिशोबानेच पेट्रोल, डिझेलचे दर निश्चित होतात. सरकार प्रयत्न करत आहे

वाढत्या इंधन दरामुळे विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे आपल्या हातात नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. आता राजस्थानमधील एका मंत्र्याने तर सर्वसामान्यांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

वाढत्या इंधन दरामुळे विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे आपल्या हातात नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. आता राजस्थानमधील एका मंत्र्याने तर सर्वसामान्यांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिला आहे. राजस्थानचे मंत्री राजकुमार रिन्वा यांनी इंधनाचे दर वाढले तर जनतेने खर्च कमी करावा असे म्हटले आहे. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार रिन्वा यांच्या या वक्तव्यामुळे झाला आहे.

जागतिक बाजारात जे कच्च्या तेलाचे दर असतात. त्या हिशोबानेच पेट्रोल, डिझेलचे दर निश्चित होतात. सरकार प्रयत्न करत आहे, असे सांगत इतके खर्च आहेत, चहुबाजुंनी पूर आला आहे. उत्पादन नाही. जनतेला समजत नाही की, कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत, काही खर्च त्यांनी कमी करावा, असे रिन्वा यांनी म्हटले.

दरम्यान, सोमवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. परभणीमध्ये पेट्रोलच्या दराने ९० ची पातळी गाठली आहे. सध्या तिथे ८९.९७ रूपये लिटर दराने पेट्रोल विकले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 6:13 pm

Web Title: reduce expenses if fuel prices increase bjp ministers advice to the people bharat bandh
Next Stories
1 FB बुलेटीन: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा भारत बंद आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या
2 सुष्मिता सेनने मुकूट घातलेल्या ‘मिस युनिव्हर्स’चं कर्करोगाने निधन
3 काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनात ‘राहुल गांधी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद’च्या घोषणा
Just Now!
X