कर्नाटकमधील अपात्र ठरविण्यात आलेल्या आमदारांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला असून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी त्यांचा भावी आमदार आणि मंत्री असा उल्लेख केला.

काँग्रेस-जेडीएसच्या या १७ आमदारांमुळे आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकलो, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले.

येडियुरप्पा यांनी या आमदारांचा भावी आमदार आणि मंत्री असा उल्लेख करून या आमदारांना देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता करणार असल्याचे संकेत दिले आहे.

राज्य भाजपचे नेते पक्षनेतृत्वाकडे उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी मंजुरीसाठी पाठविणार आहेत.