24 September 2020

News Flash

धक्कादायक: स्थलांतरीत मुलांना अमेरिकेची नाझींसारखी वागणूक

आतापर्यंत हा व्हिडियो ३० लाख जणांनी पाहिला असून त्यावरुन जर्मनीतील नाझी काळाची आठवण होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

स्थलांतरीत मुलांना अमेरिकेकडून दिली जाणारी वागणूक अतिशय चीड आणणारी आहे. काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे स्थलांतरीत झालेल्या सात वर्षाच्या मुलीचा डिहायड्रेशनमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच अमेरिका-मेक्सिकोची सीमारेषा ओलांडणाऱ्या मुलांच्या हातावर नंबर लिहीले जात असल्याचेही समोर आले आहे. ही मुले मॅक्सिकोमधून अमेरिकेत स्थलांतरीत होत आहेत. एका पत्रकाराने याबाबतची माहिती आपल्या ट्विटर हँडलद्वारे दिली असून यामध्ये व्हिडियोही अपलोड करण्यात आला आहे. त्यात अगदी छोट्या मुलांच्या हातावर नंबर लिहील्याचे दिसत आहे.

हा हातावर नंबर टाकलेला मुलांचा व्हिडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडियो ३० लाख जणांनी पाहिला असून त्यावरुन जर्मनीतील नाझी काळाची आठवण होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे लोकांच्या हातावर नंबर लिहून भूतकाळाची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रतिक्रीया लोकांनी या व्हिडियोवर दिल्या आहेत. नाझी काळातही लोकांच्या हातावर अशाप्रकारे नंबर लिहीले जात होते. त्यामुळे ही धोक्याची घंटा नाही ना अशी चिंता अनेकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Next Stories
1 राफेल वाद: संपूर्ण परिच्छेद कसा चुकू शकतो, मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल
2 २०१९च्या निवडणुकीसाठी एनडीएच्या नेतृत्वात बदल होणार नाही : अमित शाह
3 मेरा भारत महान, मेरी मॅडम महान, सुषमा स्वराजांची भेट घेताना हमीदला अश्रू अनावर
Just Now!
X