पाकिस्तानातील कारागृहात हल्ला झालेला भारतीय कैदी सरबजितसिंग याची पाकिस्तान सरकारने सुटका करावी आणि त्याच्यावर हल्ला करणाऱयांचा तपास करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सोमवारी भारताने पाकिस्तानकडे केली. सरबजितसिंगवर सध्या लाहोरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले.
सरबजितसिंगला अधिक उत्तम उपचार मिळावे, यासाठी त्याला तातडीने पाकिस्तानमधून भारतात पाठवावे, अशीही मागणी भारताने केली आहे. मानवतेच्यादृष्टिने पाकिस्तान सरकारने सरबजितची सुटका करून त्याला परत भारतात पाठविण्याचा विचार करावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सरबजितसिंगवर पाकिस्तानातच उपचार