News Flash

‘हिंदुत्त्वाचा अतिरेक देशासाठी घातक’

शशी थरूर यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद शमत नाही तोच दिग्विजय सिंग यांचेही वादग्रस्त वक्तव्य

फोटो सौजन्य 'एएनआय'

धार्मिक अतिरेक हा दहशतवादाकडेच जातो, झिया-उल-हक या पाकिस्तानातील कट्टर संघटनेमुळे तिथे दहशतवाद वाढीला लागला. अगदी असेच उदाहरण भारतातही बघायला मिळते आहे. देशात हिंदुत्त्वाचा अतिरेक होतो आहे, ही बाब देशासाठी घातक असून त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. देशात हिंदुत्त्वाचा अतिरेक केला जातो आहे, ही परंपरा भारतासाठी चांगली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपाने २०१९ च्या निवडणुका जिंकल्या तर आपल्या लोकशाहीला धोका निर्माण होईल आणि भारत हिंदू पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केले होते. त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच यासंबंधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशीही मागणी भाजपाने केली होती. हा वाद शमतो न शमतो तोच काँग्रेसचे वाचाळवीर अशी ख्याती असलेल्या दिग्विजय सिंग यांनीही पाकिस्तानचे उदाहरण देत हिंदुत्त्वाचा अतिरेक देशासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

दिग्विजय सिंग यांनी याआधीही अशीच वक्तव्ये केली आहेत. बाटला हाऊस एन्काऊंटरवर संशय घेणे असेल किंवा दहशतवादी हाफिज सईदला हाफिजजी म्हणत केलेला उल्लेख असेल त्यांच्या अनेक वक्तव्यांतून वाद निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकार हिंदुत्त्वाचा अतिरेक करत असून ते देशासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

आजच सामना अग्रलेखातून शिवसेनेने दिग्विजय सिंग आणि शशी थरूर यांचे वर्तन सुन्ता झाल्यासारखेच आहे. असे म्हणत समाचार घेतला आहे. अशात आता दिग्विजय सिंग यांचे वादग्रस्त पुन्हा एकदा समोर आले आहे. या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेस विरूद्ध भाजपा असा सामना रंगताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 12:09 pm

Web Title: religious extremism being promoted by ruling government in india the so called hindutva its a dangerous trend says digvijaya sing
Next Stories
1 दुर्देव : प्रशिक्षकाच्या मूर्खपणामुळं मॉक ड्रिलनं घेतला मुलीचा बळी
2 भारतातही इम्रान खानची अनौरस मुलं : रेहम खान
3 पीडीपी फोडण्याचा प्रयत्न केला तर दहशतवादी जन्माला येतील – मेहबुबा मुफ्ती
Just Now!
X