News Flash

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले ट्विट, म्हणाले…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती

मोदींनी केले ट्विट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९३ वी जयंती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. मोदींनी ट्विटवरून बाळासाहेबांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते कायम लोकांसाठी काम करायचे असं म्हटलं आहे.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये बाळासाहेबांना ‘शूर’ म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेबांमधील गुणांचे कौतूकही केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘शूर नेते बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. माननिय बाळासाहेब हे कायमच जनतेच्या भल्यासाठी आणि हक्कांसाठी लढत राहिले. ते खूपच धाडसी होते. बाळासाहेब बुद्धिवान होते आणि मोजकेच पण मार्मिक बोलण्याचे त्यांना वरदान लाभले होते. त्यांच्या भाषण कौशल्याने ते लाखोंच्या जनसमुदायाला आपलसं करत असतं.’

पंतप्रधान मोदींबरोबरच इतरही अनेक नेत्यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ट्विट करुन आदरांजली अर्पण केली आहे. पाहुयात कोण काय म्हणाले आहे बाळासाहेबांबद्दल बोलताना…

ते उत्तम वक्ते होते: सुरेश प्रभू

विनम्र अभिवादन!: धनंजय मुंडे

अनेकांच्या हृद्यात त्यांना विशेष स्थान: प्रफुल्ल पटेल

तेव्हा बाळासाहेब होते: अशोक पंडित (सिनेनिर्माता)

जनतेचे नेते बाळासाहेब :अनिल शितोळे

पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!: गजानन किर्तिकर

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरामध्ये स्थानिक शिवसेना नेत्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे सोशल मडियावरूनही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 10:53 am

Web Title: remembering the balasaheb thackeray on his jayanti pm modi tweets
Next Stories
1 पासपोर्टमध्ये होणार मोठा बदल, पंतप्रधान मोदींची घोषणा
2 आर्थिक दुर्बलांना आरक्षण: केंद्रीय शिक्षण संस्थांमधील जागा ३ लाखांनी वाढणार
3 मॉर्निंग बुलेटीन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X