26 February 2020

News Flash

प्रियांका चोप्राला UN च्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवा, पाकिस्तानी मंत्र्याची मागणी

पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या  'सदिच्छा दूत' पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या  ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी यांनी युनिसेफला पत्र लिहून प्रियांका चोप्राला ‘सदिच्छा दूत’ या पदावरुन हटवण्याची विनंती केली आहे. प्रियांका चोप्राने काश्मीर प्रश्नी भारत सरकारच्या भूमिकेचे तसेच पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचे जाहीर समर्थन केले आहे.

प्रियांका चोप्राने युनिसेफची सदिच्छा दूत या नात्याने शांततेचा पुरस्कार केला पाहिजे. पण तिची भूमिका या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे तिला या पदावरुन हटवावे अशी मागणी शिरीन मझारी यांनी आपल्या पत्रातून केली आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आयशा मलिका या पाकिस्तानी महिलेने लॉस एंजल्स येथील कार्यक्रमात प्रियांका चोप्राला ढोंगी म्हटले होते.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर प्रियांक चोप्राने टि्वट करुन “जय हिंद” म्हटले होते. आयशा मलिकने त्या टि्वट संदर्भात प्रियांकाला ढोंगी म्हटले होते. त्यावर प्रियांकाने “मी भारतीय असून माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत. मला स्वतःला युद्ध व्हावं असं वाटत नाही. पण मी देशभक्त सुद्धा आहे. माझ्या त्या ट्वीटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याची माफी मागते” असे उत्तर दिले होते. “माझ्या मते सर्वांसाठी एक मध्यम मार्ग असतो. तुझ्यासाठीही असेल. पण ज्या पद्धतीने तू माझ्यावर ओरडून बोलत आहेस हे योग्य नाही. आपण इथं प्रेमाच्या भावनेनं एकत्र आलो आहोत” असे प्रियांका तिला म्हणाली होती. २६ फेब्रुवारीच्या प्रियांका चोप्राच्या टि्वटवरुन संयुक्त राष्ट्राची सदिच्छा दूत म्हणून तिच्या भूमिकेवर आयशाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

First Published on August 21, 2019 4:39 pm

Web Title: remove priyanka chopra as goodwill ambassador pakistan minister dmp 82
Next Stories
1 घोटाळयाच्या पैशातून चिदंबरम यांनी स्पेनमध्ये टेनिस क्लब, यूकेमध्ये कॉटेज विकत घेतले – ईडी
2 चीन भारताविरुद्ध वापरणार रोबो सैनिक, १४ हजार फुटांवर केला युद्ध सराव
3 मोदी सरकारकडून पी. चिदंबरम यांचं चारित्र्यहनन सुरु – राहुल गांधी
Just Now!
X