28 February 2021

News Flash

अयोध्या राम मंदिराबाबतचं ‘ते’ वृत्त चुकीचं, विश्वस्त मंडळाने केलं स्पष्ट

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळात समनव्याचा अभाव

(Image: ayodhya.gov.in)

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे सध्या सर्वांच लक्ष लागलं आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान राम मंदिर उभारलं जात असताना जमिनीत दोन हजार फूट खाली ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.

चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “राम मंदिरं उभारलं जाणार आहे त्या ठिकाणी ५ ऑगस्ट रोजी जमिनीखाली टाइम कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका”.

आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम घरातूनच पाहता येणार

महत्त्वाचं म्हणजे याआधी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनीच टाइम कॅप्सूल ठेवलं जाणार असल्याची माहिती दिली होती. “राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार आहे. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास त्याला यामुळे रामजन्मभूमी बद्दलची केवळ तथ्यं सापडतील,” असं त्यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजन : ८०० किलोमीटरचा प्रवास करुन मुस्लीम भाविक राहणार सोहळ्याला उपस्थित

आणखी वाचा- पंतप्रधानांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील : ओवेसी

टाइम कॅप्सूल म्हणजे काय ?
वर्तमानकालीन महत्वाच्या घटनांची नोंद असलेले कागदपत्र व इतर वस्तू असलेली जमिनीत पुरुन ठेवलेली कुपी कालकुपी भावी पिढ्यांना उत्खननानंतर सद्यःस्थितीची माहिती व्हावी हा त्यामागील हेतू असतो

५ ऑगस्ट रोजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार असून, यासाठी विशेष तयारी सुरू आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संगम अर्थात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे. तसेच, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 3:22 pm

Web Title: reports about placing of a time capsule under the ground at ayodhya ram temple construction site are false sgy 87
Next Stories
1 पंतप्रधानांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील : ओवेसी
2 फेक न्यूज प्रकरण : चीनच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन कंपनीला भारतीय न्यायालयाची नोटीस
3 मैत्रीच्या आडून चीन रशियाबरोबर सुद्धा करत होता दगाबाजी
Just Now!
X