News Flash

राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा; भारताच्या सामर्थ्य-संस्कृतीचे जगाला दर्शन

देशभरात ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

भारताचा ६८ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात दिल्लीतील राजपथावर संपन्न झाला. यावेळी भारतीय सैन्य जगाला आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. शिस्तबद्ध संचलन आणि श्वास रोखायला लावून धरायला लावणाऱ्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यासोबतच राज्य सरकार आणि केंद्राचे विविध चित्ररथदेखील उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.

अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजपथावर स्वागत केले.

संयुक्त अरब अमिरातीच्या १७९ सैनिकांनी केलेले संचन हे यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. यासोबतच नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या कमांडोंनी पहिल्यांदाच राजपथावर संचलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नॅशनल सिक्युरिटी गार्डचे कमांडो अर्थात ब्लॅक कॅट्सचे संचलन अत्यंत दिमाखदार होते.

Kunal Gavankar January 26, 201711:30 am

३ सुखोई विमानांची आकाशात भरारी

Kunal Gavankar January 26, 201711:29 am

५ मिग-२९ विमानांचे प्रात्यक्षिक

Kunal Gavankar January 26, 201711:29 am

जॅग्वार विमानांची वेगवान भरारी

Kunal Gavankar January 26, 201711:28 am

तीन तेजस विमानांचे ताशी ७८० किलोमीटर वेगाने प्रात्यक्षिक

Kunal Gavankar January 26, 201711:26 am

सी-१७ ग्लोबमास्टर विमानाचे प्रात्यक्षिक

Kunal Gavankar January 26, 201711:22 am

हवाई दलाच्या मिग विमानांची भरारी

Kunal Gavankar January 26, 201711:20 am

जवानांच्या मोटारसायकलवर चित्तथरारक कसरती

Kunal Gavankar January 26, 201711:14 am

नृत्यांच्या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक वैविध्यतेचे राजपथावर दर्शन

Kunal Gavankar January 26, 201711:07 am

शौर्य पुरस्कार विजेती लहान मुले राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:59 am

जीएसटीचे महत्त्व सांगणारा चित्ररथ राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:58 am

आसामचा चित्ररथ राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:57 am

जम्मू काश्मीरचा चित्ररथ राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:50 am

बेटी बचाव, बेटी पढाओचा संदेश देणारा हरियाणाचा चित्ररथ राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:49 am

हिमाचल प्रदेशचा चित्ररथ राजपथावर; स्थानिक कलांची झलक

Kunal Gavankar January 26, 201710:49 am

दिल्लीच्या चित्ररथातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित

Kunal Gavankar January 26, 201710:45 am

चित्ररथाच्या माध्यमातून भारताचा सांस्कृतिक ठेवा राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:44 am

मणीपूरचा चित्रपथ राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:43 am

महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर; लोकमान्य टिळकांना चित्ररथातून आदरांजली

Kunal Gavankar January 26, 201710:42 am

ओडिशा, अरुणाचल प्रदेशाचे चित्ररथ राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:41 am

एनसीसी, एनएसएसच्या पथकांचे शिस्तबद्ध संचलन

Kunal Gavankar January 26, 201710:36 am

नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे पहिल्यांदाच राजपथावर संचलन

Kunal Gavankar January 26, 201710:34 am

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे राजपथावर संचलन

Kunal Gavankar January 26, 201710:30 am

सीमा सुरक्षा दलाचे राजपथावर संचालन

Kunal Gavankar January 26, 201710:22 am

स्वदेशी धनुष तोफ लवकरच राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:16 am

रणगाडा पथकाची राष्ट्रपतींना मानवंदना

Kunal Gavankar January 26, 201710:13 am

ब्रम्होस प्रणाली राजपथावर दाखल

Kunal Gavankar January 26, 201710:12 am

भीष्म रनगाड्यांची तुकडी राजपथावर

Kunal Gavankar January 26, 201710:10 am

संयुक्त अरब अमिरातीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांचे दिमाखदार संचलन

Kunal Gavankar January 26, 201710:09 am

संयुक्त अरब अमिरातीच्या १४९ जवानांचे संचलन

Kunal Gavankar January 26, 201710:05 am

शहीद हंगपन दादा यांच्या पत्नीने अशोक चक्र स्विकारले

Kunal Gavankar January 26, 201710:04 am

हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र; दहशतवाद्यांशी लढताना हंगपन दादा यांना वीरमरण

Kunal Gavankar January 26, 20179:59 am

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राजपथावर दाखल

Kunal Gavankar January 26, 20179:58 am

पंतप्रधान मोदींकडून अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत

Kunal Gavankar January 26, 20179:56 am

पंतप्रधान मोदींनी घेतली मुख्य न्यायाधीश खेहर यांची भेट

Kunal Gavankar January 26, 20179:51 am

राजपथाजवळ संचलन पाहण्यासाठी शेकडो लोकांची उपस्थिती

Kunal Gavankar January 26, 20179:40 am

पंतप्रधान मोदींचे शहिदांना वंदन; अमर जवान ज्योतीजवळ शहिदांना श्रद्धांजली अर्पित

Kunal Gavankar January 26, 20179:39 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजपथावर आगमन

Kunal Gavankar January 26, 20179:36 am

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर अमर जवान ज्योतीजवळ पोहोचले; शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण

Kunal Gavankar January 26, 20179:34 am

राजपथावर तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित

Kunal Gavankar January 26, 20179:31 am

अमर जवान ज्योतीजवळ सैन्याकडून शहिदांना वंदन

Kunal Gavankar January 26, 20179:31 am

सकाळी १० वाजता सुरू होणार राजपथावरील संचलनाला सुरुवात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 9:12 am

Web Title: republic day 2017 live updates parade narendra modi pranab mukherjee uae crown prince army air force
Next Stories
1 देशातील भ्रष्टाचारात थोड्या प्रमाणात घट; न्यूझीलंड, डेन्मार्क सर्वाधिक पारदर्शक
2 घातपाताच्या शक्यतेने प्रजासत्ताकदिनी कडक बंदोबस्त
3 अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ांमुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम
Just Now!
X