News Flash

Republic Day: राजपथावर लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन

70th Republic Day: देशभरात शुक्रवारी ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली.

70th Republic Day: देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला असून दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली. या सोहळ्यात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

देशभरात शुक्रवारी ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिल्लीत विजय चौक येथून संचलनाला सुरुवात झाली. राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग, नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ला येथे परेडची सांगता झाली. सुमारे ९० मिनिटांचा हा शानदार सोहळा असेल. यात २२ राज्यांचे चित्ररथ आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते.

Live Blog
11:36 (IST)26 Jan 2019
हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती
11:35 (IST)26 Jan 2019
चित्तथरारक कसरती सादर करताना जवान
11:34 (IST)26 Jan 2019
राजपथावरील लष्कराचे जवान
10:29 (IST)26 Jan 2019
लष्करातील 'के-९ वज्र'ची झलक
10:28 (IST)26 Jan 2019
राजपथावर लष्करी सामर्थ्याची झलक
10:16 (IST)26 Jan 2019
राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण.  दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

10:12 (IST)26 Jan 2019
नाझिर अहमद वानी यांना मरणोत्तर अशोक चक्र
10:02 (IST)26 Jan 2019
हस्तांदोलन करताना आजी- माजी पंतप्रधान

पंतप्राधन नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तांदोलन केले.

09:46 (IST)26 Jan 2019
शहीद जवानांना मोदींची मानवंदना
09:45 (IST)26 Jan 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहिदांना मानवंदना

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर पोहोचले असून त्यांनी अमर ज्योती जवान येथे आदरांजली वाहिली. तिन्ही दलाचे प्रमुख या प्रसंगी उपस्थित होते. 

09:37 (IST)26 Jan 2019
शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडत असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ध्वजारोहण केले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

09:35 (IST)26 Jan 2019
दिल्लीतील राजपथावर थोड्याच वेळात परेडला सुरुवात
09:35 (IST)26 Jan 2019
नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण केले
08:58 (IST)26 Jan 2019
सागर मुगलेकडे राजपथवरील एनसीसीच्या पथकाचे नेतृत्व

दिल्लीला होणार्‍या परेडमध्ये यंदा एनसीसीच्या पथकाचे प्रतिनिधित्व औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर मुगले करणार आहे. देशभरातील २ हजार विद्यार्थ्यांमधून अंतिम निवड झालेल्या १४८ विद्यार्थ्यांची तुकडी परेडसाठी सज्ज असेल. वाचा सविस्तर

08:39 (IST)26 Jan 2019
नाशिकमधील शेतकऱ्याचा मुलगा राजपथावर करणार NSS चे नेतृत्व

पुणे येथील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरींग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस पथकाचे नेतृत्व करणार आहे. राज्यातील १४ विद्यार्थ्यांही या पथसंचलनात भाग घेणार आहेत. २१ वर्षीय दर्पेश डिंगर हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील तोकडे गावाचा आहे. वाचा सविस्तर

08:35 (IST)26 Jan 2019
भाजपा मुख्यालयात ध्वजारोहण

भाजपा मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ध्वजारोहण केले.

08:34 (IST)26 Jan 2019
दिल्लीत राजपथावर नागरिकांची गर्दी

दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे २५ हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राजपथावर सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल हिट टीम, अँटी एअरक्राफ्ट गन आणि शार्पशूटरही तैनात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Next Stories
1 सीरियल किलरला कुंभ मेळयातून अटक, सहा महिन्यात केल्या दहा हत्या
2 ट्रम्प यांची विरोधकांबरोबर डील! तीन आठवडयांसाठी अमेरिकेची शटडाऊनमधून सुटका
3 ‘सर्वच लोकशाही संस्थांत संघाचा घुसखोरीचा प्रयत्न’
Just Now!
X