News Flash

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

गुगलच्या डुडलमध्ये भारतीय तिरंगा

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने खास डुडल तयार केले आहे. गुगलने डुडलमध्ये एक स्टेडियम दाखवले आहे. या स्टेडियममध्ये लोक भारतीय ध्वजाच्या रंगात उभे आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात घटना लागू झाली. या घटनेला ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे गुगलने खास डुडल तयार केले आहे.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने घटना स्विकारली. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात घटना लागू करण्यात आली आणि भारत देश प्रजासत्ताक बनला. तेव्हापासून २६ जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १९३० साली २६ जानेवारीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करत ब्रिटिशांविरोधातील लढा तीव्र केला. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने याच दिवशी घटना लागू केली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. भारताची घटना जगातील सर्वात मोठी घटना आहे.

भारताचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजपथावर संपन्न झाला आहे. यामधून भारतातील परंपरा, विविध संस्कृती आणि या वैविध्यातूनही जपली जाणारी एकता यांचा परिचय जगाला मिळाला. संयुक्त अरब अमिरातीच्या १७९ सैनिकांनी केलेले संचलन आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सकडून पहिल्यांदाच करण्यात आलेले संचलन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 12:47 pm

Web Title: republic day google celebrates 68th republic day india doodle
Next Stories
1 अखेरच्या क्षणी पद्म पुरस्कारांच्या यादीतून मुफ्ती मोहम्मद सईद यांचे नाव हटवले
2 राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा; भारताच्या सामर्थ्य-संस्कृतीचे जगाला दर्शन
3 देशातील भ्रष्टाचारात थोड्या प्रमाणात घट; न्यूझीलंड, डेन्मार्क सर्वाधिक पारदर्शक
Just Now!
X