महाराष्ट्रातील एल्गार परिषद, भीमा-कोरेगाव प्रकरणाशी माओवाद्यांचा संबंध असल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला.  न्या. यू. यू. ललित आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या पीठापुढे ही सुनावणी झाली.

झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी नवलखा यांची बाजू मांडली. राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एनआयए) अतिरिक्त महाधिवक्ता एस. व्ही. राजू यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणी विहित कालावधीत दोषारोपपत्र दाखल न झाल्याने नवलखा यांची सुटका करावी, अशी त्यांची मागणी होती. त्यावर न्यायालयाने ३ मार्च रोजी एनआयएला म्हणणे मांडण्यास सांगितले होेते.