मुंबईचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या महत्त्वाच्या प्रभारासह काँग्रेसच्या १२ सरचिटणीसांमध्ये स्थान पटकावले आहे. मात्र, मुत्तेमवार यांना सरचिटणीसपदावरून काढून मुरली देवरा आणि शिवाजीराव देशमुख यांच्यासह त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत कायम निमंत्रितांमध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कामत यांच्याव्यतिरिक्त मुकुल वासनिक यांची सरचिटणीसपदी, तर प्रिया दत्त, संजय निरुपम, अविनाश पांडे यांची सचिवपदी नियुक्ती कायम आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना सरचिटणीसपदी बढती देण्यात आली आहे.  
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील २५ सदस्यीय अ. भा. काँग्रेस कार्यकारिणीत पंतप्रधान मनमोहन सिंह, उपाध्यक्ष राहुल गांधी, संरक्षणमंत्री ए.के. अँटनी, सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल, कोषाध्यक्ष मोतीलाल वोरा, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, हेमा प्रोवा सैकिया आणि सुशीला तिरिया यांच्यासह १२ सरचिटणीसांचा समावेश आहे. चार पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. कायम निमंत्रितांमध्ये अजित जोगी, कॅप्टन अमिरदर सिंग, बेनीप्रसाद वर्मा, के.एस. राव, डॉ. कर्ण सिंह, एम. एल. फोतेदार, एम. व्ही. राजशेखरन, मोहसीना किडवाई, मुरली देवरा, ऑस्कर फर्नाडिस, पी. चिदंबरम, आर. के. धवन, एस. एम. कृष्णा, शिवाजीराव देशमुख आणि विलास मुत्तेमवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्य पदाधिकारी
*    उपाध्यक्ष : राहुल गांधी (सर्व फ्रंटल संघटना, सहकारी सचिव प्रभाकिशोर तावियाड, सूरज हेगडे)
*    कोषाध्यक्ष : मोतीलाल वोरा (काँग्रेस मुख्यालय प्रशासन, सहकारी सचिव मनीष चतरथ)

काँग्रेसचे पदाधिकारी, त्यांना सोपविण्यात आलेले प्रभार आणि सहकारी सचिवांची यादी
*    अजय माकन (संपर्क, प्रसिद्धी आणि प्रकाशन, सहकारी सचिव प्रिया दत्त),
*     अंबिका सोनी : (हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि काँग्रेस अध्यक्षांचे कार्यालय, सहकारी सचिव गीताश्री ओराँव, मैनुल हक आणि संजय कपूर),
*    बी. के. हरिप्रसाद : (छत्तीसगढ, झारखंड आणि ओडिशा, सहकारी सचिव भक्तचरण दास, शुभंकर सरकार आणि ताराचंद भगोरा),
*    डॉ. सी. पी. जोशी (आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, सहकारी सचिव अरुण यादव, अविनाश पांडे, किशोरलाल शर्मा, परेश धनानी, शकील अहमद खान),
*     दिग्विजय सिंह (आंध्र प्रदेश, गोवा आणि कर्नाटक, सहकारी सचिव डॉ. ए. चेल्लाकुमार, आर. सी. खुंटिया, शांताराम नाईक आणि थ्रुनावुक्कारासर),
*    गुरुदास कामत (गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, सहकारी सचिव अशोक तंवर, अश्वनी सेखरी, मिर्झा ईर्शाद बेग आणि सज्जनकुमार वर्मा),
*    जनार्दन द्विवेदी (अ. भा. काँग्रेसच्या बैठकी, अ. भा. काँग्रेस विभाग, काँग्रेस कार्यकारिणी, संघटना, संघटनात्मक निवडणुका, सत्र आणि समन्वय),
*    लुईझिनो फालैरो (अरुणाचल प्रदेश, मणीपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा, सहकारी सचिव भूपेनकुमार बोराह, के. जयकुमार आणि डॉ. विजयालक्ष्मी साधो),
*     मधुसूदन मिस्त्री (उत्तर प्रदेश आणि केंद्रीय निवडणूक समिती, सहकारी सचिव नसीब सिंह, प्रकाश जोशी, राणा गोस्वामी आणि झुबेर खान),
*     मोहन प्रकाश (मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, सहकारी सचिव बलराम बच्चन, राकेश कालिया, संजय निरुपम आणि श्योराज जीवन वाल्मीकी),
*     मुकुल वासनिक (केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि  लक्षद्वीप, सहकारी सचिव दीपक बाबरिया, डॉ. जी. चेन्नारेड्डी आणि व्ही. डी. सतीशन),
*    शकील अहमद (दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि चंदिगढ, सहकारी सचिव आशा कुमारी, हरीश चौधरी, कुलजीत नागरा). व्ही. हनुमंतराव आणि अवतारसिंह भडाना हे सचिव असंग्लन आहेत.