डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या पाच वर्षांमधला हा सर्वात उच्चांकी दर आहे. याआधी जुलै २०१४ या महिन्यात महागाईचा दर ७.३९ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात म्हणजेच मागच्या महिन्यात हा दर ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्के होता. तर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात हा दर २.११ टक्के इतकाच होता. मात्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून समोर आलेल्या आकड्यांनुसार गेल्या पाच वर्षांतला उच्चांकी दर महागाईने डिसेंबर महिन्यात गाठला आहे.

इंधन दराने डिसेंबर महिन्यात काहीसा दिलासा दिला. आता केंद्र सरकारने सोमवारी महागाईची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीमध्ये डिसेंबर महिन्यातला किरकोळ महागाई दर ७.३५ टक्के इतका पोहचला आहे. पाच वर्षांमधला हा सर्वात उच्चांकी दर आहे. डिसेंबर महिन्यात कांदाही १२५ ते १५० रुपये प्रति किलो गेला होता. अवकाळी पावसाच्या अस्मानी संकाटामुळे शेतीचं नुकसान झालं होतं. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने किंमती वाढल्या होत्या.

महत्त्वाचे मुद्दे

डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७.३५ टक्के नोंदवला गेला

नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्के होता

डिसेंबर २०१८ या महिन्यात किरकोळ महगाईचा दर २.११ टक्के इतका नोंदवला गेला

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात महागाई दर ७.३५ टक्क्यांवर पोहचला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत त्यामध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात कांदा १५० रुपये प्रति किलो पर्यंत महागला होता. सध्याच्या घडीला कांद्याचे दर ७० रुपये प्रति किलोपर्यंत खाली उतरले आहेत. भाजीपाल्याच्या किंमतीही आता कमी झाल्या आहेत.