दहशतवाद व हेरगिरीच्या प्रकरणांत शिक्षा पूर्ण केल्यानंतरही काही भारतीयांना कैदेत ठेवल्याबद्दल इस्लामाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी पाकिस्तान सरकारची कानउघाडणी केली आणि त्यांना परत पाठवण्याचा आदेश दिला, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

आठ भारतीय नागरिकांनी सुटकेसाठी केलेल्या याचिकांची सुनावणी करताना अंतर्गत मंत्रालयाच्या प्रतिनिधीने इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनाल्ला यांना अहवाल सादर केल्याचे वृत्त ‘जिओ न्यूज’ने दिले.

पाच भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे पाकिस्तान सरकारने २६ ऑक्टोबरला त्यांची सुटका केली व त्यांना मायदेशी परत पाठवले, अशी माहिती पाकिस्तानचे एक उप- अ‍ॅटर्नी जनरल सैयद मोहम्मद तय्यब शाह यांनी न्यायालयाला दिली.