26 February 2021

News Flash

शबरीमला महिला प्रवेश: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका

महिलांना मंदीर प्रवेश खुला करणारा निकाल अस्वीकारार्ह व अयोग्य असल्याची तक्रार

शबरीमला मंदिर

केरळच्या सुप्रसिद्ध शबरीमला मंदिराचे दरवाजे सुप्रीम कोर्टाने महिलांसाठी खुले केल्यानंतर, या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. नॅशनल अय्यप्पा डिव्होटीज असोसिएशनच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली असून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय विकृत नसला तरी अस्वीकारार्ह व अयोग्य असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी बोलावलेल्या बैठकीला न जाण्याचा निर्णय मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी घेतला आहे. “आधीच्या निकालाविरोधात आम्ही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेचं काय होतं यावरून आम्ही पुढचा कार्यक्रम ठरवू. आत्ता सरकारशी चर्चा करण्यात काय अर्थ आहे,” शबरीमालाच्या कंदारारू मोहनारू यांनी सांगितले. नायर सेवा समाजाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

मंदिराच्या प्राचीन परंपरा टिकाव्यात असं आम्हाला वाटत असल्याचे पंडलम या शाही कुटुंबाचे प्रवक्ते आर. आर. वर्मा यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कशी अमलबजावणी करावी यावर चर्चा करण्यात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिराची ऐतिहासिक परंपरा जतन करावी अशी अय्यप्पाच्या भक्तांची मागणी असून त्यासाठी निदर्शनेही करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सनातन धर्माच्या परंपरांचं पालन करावं यासाठी करण्यात आलेल्या या निदर्शनांमध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली नसल्याने सीपीआय (मार्क्सवादी) च्या विरोधात काँग्रेस व भाजपा या दोघांनी टिकेची झोड उठवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठानं 4 – 1 अशा फरकानं शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा असा निकाल दिला होता. अनेक शतकांच्या या परंपरेचा अत्यावश्यक धार्मिक परंपरांमध्ये समावेश होत नसल्याचा निष्कर्ष सुप्रीम कोर्टानं काढला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 2:23 pm

Web Title: review petition in supreme court against sabarimala ruling
Next Stories
1 दोन वर्षानंतरही जेएनयूच्या नजीबचा ठावठिकाणा नाहीच, CBI क्लोजर रिपोर्ट करणार सादर
2 VIDEO: उपसभापती म्हणून आले निवडून आणि चक्क पडले हत्तीवरून!
3 मुख्यमंत्र्यांच्या बॅनरखाली मंत्र्याची लघुशंका
Just Now!
X