24 September 2020

News Flash

सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : ‘त्या’ घरांच्या खरेदीबाबत रियाचा ईडीसमोर मोठा खुलासा; म्हणाली…

आलिशान फ्लॅट्स कसे घेतले? रियाने केला हा खुलासा

संग्रहित छायाचित्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीची शुक्रवारी (७ ऑगस्ट) ईडी चौकशी करण्यात आली. ८ तास झालेल्या या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा झाला असून रियाने तिच्या संपत्तीविषयी खुलासा केला आहे. आतापर्यंत घेतलेली प्रत्येक प्रॉपर्टी स्वत:च्या कमाईतून घेतल्याचं तिने सांगितलं आहे.

शुक्रवारी झालेल्या ईडीच्या चौकशीमध्ये रियाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. यात रियाच्या मुंबईस्थित दोन फ्लॅटचीदेखील चौकशी करण्यात आली. हे फ्लॅटस सुशांत सिंह राजपूतच्या खात्यातून काढलेल्या पैशातून घेतल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, ईडीच्या चौकशीमध्ये हे दोन्ही फ्लॅट मी स्वत: घेतले आहेत, असं उत्तर रियाने दिल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात म्हटलं आहे.

वाचा : सुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स

रियाने खार आणि नवी मुंबई येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये दोन फ्लॅट घेतले आहेत. यातील खारमधील घर जवळपास ८५ लाख रुपयांचं असून त्यासाठी रियाने २५ लाखांचं डाऊनपेमेंट केलं होतं. तर ६० लाखांचं गृहकर्ज घेतलं होतं. हा फ्लॅट ५५० स्क्वेअर फिटचा आहे. तर दुसरा फ्लॅट २०१२ मध्ये घेतला होता आणि २०१६ मध्ये या घराचा ताबा मिळाला होता.या फ्लॅटची किंमत ६० लाख रुपये आहे.

दरम्यान, रियाचं वार्षिक उत्पन्न १५ ते १७ लाख रुपये आहे. त्यामुळे कोटयवधींचे फ्लॅट रियाने कसे घेतले असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु ईडीच्या चौकशीमध्ये रियाने या गोष्टींचा खुलासा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 8:43 am

Web Title: rhea chakraborty tells ed paid for everything with my own income didnt syphon off sushants money ssj 93
Next Stories
1 संशोधनासाठी आलेले इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी; भारताला मिळणार चांगली बातमी?
2 योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा ठरले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा कितवा क्रमांक ?
3 केरळ विमान अपघात : १७ जणांचा मृत्यू; AAIB करणार तपास
Just Now!
X