चीनबरोबर पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या वादानंतर भारतीय हवाई दलाने त्यांची विमाने व इतर सामग्री त्या भागात तैनात केल्याने प्रतिस्पर्धी देशास योग्य तो संदेश गेला, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. पूर्वीचा बालाकोट हल्ला व आताची सीमेवरील तैनाती यामुळे दोन्ही प्रसंगांत संबंधित देशांना ठोस संदेश गेला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ कमांडर्सच्या तीन दिवसांच्या बैठकीत त्यांनी सांगितले, की देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण ही भारताची प्राथमिकता असून त्यावर आम्ही ठाम आहोत. देशातील लोकांचा लष्करी दलांवर पूर्ण विश्वास आहे. दरम्यान, राफेल लढाऊ विमानांचा पहिला टप्पा फ्रान्सकडून लवकरच मिळणार असून ही विमाने लडाख सीमेवर तैनात करणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

भारतीय हवाई दलाने  व्यावासायिक कौशल्याने पाकिस्तानमधील बालाकोट येथे गेल्या वर्षी हवाई हल्ले केले. त्यानंतर आता पूर्व लडाखमध्येही भारतीय हवाई दलाने विमाने व इतर सामग्री तैनात करून संचालनात्मक क्षमतेची चुणूक दाखवली, सीमेवरील चौक्यांवर विमाने सज्ज करण्यात आली यातून प्रतिस्पर्धी देशास योग्य तो संदेश गेला असे त्यांनी स्पष्ट केले

देशाच्याच्या हवाई सुरक्षेचा आढावा तीन दिवसांच्या परिषदेत घेतला जाणार आहे.