दिल्लीजवळील नॉयडास्थित रिंगिंग बेल्स या स्वस्तात स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपनीच्या व्यवहारांबद्दल संशय व्यक्त केला जात असून त्यांच्या २५१ रुपयांत हँडसेट उपलब्ध करून देण्याच्या दाव्याची वैधता अबकारी आणि प्राप्तिकर खात्यांकडून पडताळून पाहिली जात आहे. कंपनीने गेल्या आठवडय़ात फ्रीडम २५१ हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला होता.
प्रप्तिकर खाते या कंपनीच्या आर्थिक रचनेची माहिती घेत असून कंपनीच्या नोंदणी प्रमाणपत्रासह कागदपत्रे मागवून घेण्यात आली आहेत. ‘कंपनीला अबकारी आणि प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी बेट दिल्याची माहिती खरी आहे. आम्ही मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि स्टार्ट-अप इंडिया या उपक्रमांतर्गत महत्त्वाचे काम करत आहोत. त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे आखून दिल्या आणि सहकार्य केले, असे रिंगिंग बेल्सचे अध्यक्ष अशोक चड्ढा यांनी सांगितले.