News Flash

व्हिडिओ: लालूंकडून मोदींच्या वक्तव्याचे ‘डबस्मॅश’

लालूंनी यावेळी 'डबस्मॅश अॅप'च्या माध्यमातून मोदींवर शरसंधान केले आहे.

डबस्मॅश व्हिडिओतून लालूप्रसाद यादव यांच्याकडून मोदींची नक्कल.

राष्ट्रीय जनता दलाचे(राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. लालूप्रसाद यांनी यावेळी लोकप्रिय संवाद डब करता येण्याची सुविधा देणाऱया ‘डबस्मॅश अॅप’च्या माध्यमातून मोदींवर शरसंधान केले आहे. मोदींच्या वक्तव्यांची नक्कल करीत लालूप्रसाद यांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली आहे. ‘अच्छे दिन आले वाले है’ या मोदी सरकारच्या बहुचर्चित घोषवाक्याचे तसेच मोदींच्या भाषणशैलीची नक्कल लालूंनी या डबस्मॅश व्हिडिओत केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदींनी सोशल मीडियावर भर देऊन त्याचा आपल्या प्रचारात भरपूर वापर केला होता. त्यामुळे आता बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव देखील सोशल मीडियावर चांगले सक्रिय होऊ पाहत असून मोदींवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2015 5:24 pm

Web Title: rjd chief lalu prasad makes his dubsmash debut with narendra modi mimicry
टॅग : Lalu Prasad
Next Stories
1 जर्मनी भारताचा नैसर्गिक भागीदार- नरेंद्र मोदी
2 गोमांस बंदीला स्थगिती ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
3 रमझान महिन्यात मुसलमान वेळ वाया घालवतात!
Just Now!
X