25 November 2020

News Flash

मला पुन्हा रांचीच्या रूग्णालयात जायचं नाहीये, लालूप्रसाद यांचं एम्सला पत्र

लालूंनी रांचीच्या रूग्णालयात सुविधा नसल्याची तक्रार करत आपल्याला पुन्हा तिथे जायची इच्छा नसल्याचे एम्सला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झालेले माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद)सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झालेले माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एम्समध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांचा मुक्काम रांचीतील तुरूंगात होता. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रांचीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना एम्समध्ये हलवण्यात आले होते. आता लालूप्रसाद यांची प्रकृती ठीक असून त्यांना पुन्हा रांचीला पाठवण्याची शिफारस एम्सने केली आहे. परंतु, लालूंनी रांचीच्या रूग्णालयात सुविधा नसल्याची तक्रार करत आपल्याला पुन्हा तिथे जायची इच्छा नसल्याचे एम्सला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, लालूंचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एम्सने घाईघाईत हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. एम्सच्या निर्णयामुळे आपल्याला धक्का बसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रांचीच्या तुरूंगात शिक्षा भोगत असताना लालूंना त्रास जाणवू लागल्याने रांचीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात हलवण्यात आले होते. एम्समधील उपचारानंतर लालूंच्या प्रकृतीत सुधारणा झाली. लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली असून त्यांना रांचीच्या वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात यावे, अशी शिफारस एम्सने केली.

एम्सच्या या निर्णयानंतर लालू चांगलेच भडकल्याचे दिसतात. रांचीच्या रूग्णालयात योग्य सुविधा नसल्यामुळे आपल्यावर एम्समध्येच उपचार करण्याची मागणी करत मला पुन्हा रांचीच्या रूग्णालयात जायची इच्छा नसल्याचे म्हटले. तिकडे तेजस्वी यादव यांनीही एम्सच्या निर्णयावर टीका केली. एम्सच्या या निर्णयामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांनी घाईत हा निर्णय घेतला आहे. लालूंना तडकाफडकी रांचीला पाठवण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण एम्सच्या अधिकाऱ्यांनाच माहीत असेल, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एम्समध्ये जाऊन लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या बैठकीत आगामी निवडणुकांसंबंधी चर्चा झाल्याचेही सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 3:23 pm

Web Title: rjd chief lalu prasad yadav dont want to be shifted back to ranchi hospital for treatment writes aiims
Next Stories
1 प्रेरणादायी: ब्रेन टयूमरशी लढा देत तिने मिळवला ‘ब्यूटी क्वीन’चा किताब
2 नारद म्हणजे प्राचीन काळातील गुगल, बिप्लब देब यांच्यानंतर विजय रुपाणी यांचा जावईशोध
3 ज्येष्ठ नेत्यांची सुटी, कन्हैया कुमारची राजकारणात एन्ट्री
Just Now!
X