पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयामुळे अस्तित्वासाठी लढणाऱ्या ‘अठरापगड’ जनता परिवाराने आता बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची साथ घेण्याचे ठरविले आहे. त्यासंबंधी अधिकृत घोषणा जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी पाटण्यात केली. काँग्रेसशी हातमिळवणी केली तरी जनता परिवार दुभंगणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. मात्र काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने जनता परिवाराती राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेस व नितीशकुमार एकत्र येवून राजदची मतपेटी पळवण्याची भीती लालूप्रसाद यादव यांना आहे. त्यामुळे जदयू व काँग्रेसच्या युतीवर प्रतिक्रिया देण्याचे लालूप्रसाद यादव यांनी टाळले. लालूप्रसाद यांना भाजप बळ देत असल्याचा संशय असल्याने नितीशकुमार स्वत  राजदशी युती करण्या फारसे उत्सूक नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील भाजपविरोधात मदतीला घेतले जाणार असल्याचे शरद यादव यांनी स्पष्ट केले.
नितीशकुमार हेच जनता परिवाराकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. गेल्या काही दिवसांपासून जनता परिवार एकत्र येण्याची  घोषणा राजद, जदयू, धर्मनिरपेक्ष जनता दल, सपच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीत केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्याची चिन्हे नाहीत.

धर्माध शक्तींना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. सर्व समविचारी पक्षांशी चर्चा केली जाईल. जनता परिवाराच्या विलीनिकरणात काही तांत्रिक अडचणी आहेत.
-शरद यादव, अध्यक्ष जनता दल