दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे (टेरी) अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांच्याविरोधात ‘टेरी’च्याच एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पचौरी यांना गुरुवारी समन्स धाडले होते. मात्र, त्यांना हंगामी जामीन मंजूर करण्यात आला. सप्टेंबर, २०१३ मध्ये आपण ‘टेरी’मध्ये दाखल झाल्यानंतर दोन वर्षे पचौरी यांनी आपले लैंगिक छळ केल्याचा आरोप संबंधित महिला कर्मचाऱ्याने केला आहे. पचौरी ई-मेल आणि मोबाइल संदेशांद्वारे आपला लैंगिक छळ करत होते, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी पचौरी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2015 4:37 am