29 September 2020

News Flash

इंडियन एअर फोर्सचे पुढचे प्रमुख आरकेएस भदौरिया

एअर मार्शल आरकेएस भदौरिया भारताचे पुढचे हवाई दल प्रमुख असतील.

एअर मार्शल आरकेएस भदौरिया भारताचे पुढचे हवाई दल प्रमुख असतील. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ही घोषणा केली. सध्या ते एअर फोर्सचे व्हाइस चीफ आहेत. त्यांनी फ्रान्सबरोबरच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली होती. सध्याचे इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत.

सरकारने एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांची हवाई दल प्रमुखपदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने टि्वटरवरुन ही माहिती दिली. आरकेएस भदौरिया १९८० साली फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले. भदौरिया यांच्याकडे ४२५० तासांपेक्षा जास्तवेळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमानांसह २६ वेगवेगळया प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे.

एअर फोर्स प्रमुख पदावर पोहोचण्याआधी त्यांनी अन्य महत्वाच्या पदांवर वेगवेगळया जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. जॅग्वार स्क्वाड्रनचे नेतृत्व त्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 6:29 pm

Web Title: rks bhadauria to be next chief of air staff dmp 82
Next Stories
1 राहुल गांधींनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी
2 PNB case: नीरव मोदीच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ
3 पत्नीनेच कापला हात, मुलाने उडवले शीर; सरकारी नोकरीसाठी निर्घृण हत्या
Just Now!
X