एनडीएचा भाग असलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी सोमवारी एनडीएला सोडचिठ्ठी देताना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचाही राजीनामा दिला. एएनआयने आपल्या सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

कुशवाह यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरु होण्यापूर्वी आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीली हजेरी लावण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांचे हे राजकीय पाऊल ४० लोकसभा जागा असलेल्या बिहारमध्ये राजकीय समीकरणे बदलू शकतात.