News Flash

पाकिस्तानात बस-ट्रक अपघातात ५८ ठार

क्षमतेहून अधिक प्रवाशांनी भरलेली बस आणि वेगाने येणारा ट्रक यांची सिंध प्रांताच्या दक्षिण भागांत मंगळवारी जोरदार टक्कर होऊन बसने पेट घेतल्याने झालेल्या अपघातात २१ महिला

| November 12, 2014 01:08 am

क्षमतेहून अधिक प्रवाशांनी भरलेली बस आणि वेगाने येणारा ट्रक यांची सिंध प्रांताच्या दक्षिण भागांत मंगळवारी जोरदार टक्कर होऊन बसने पेट घेतल्याने झालेल्या अपघातात २१ महिला आणि १९ मुलांसह ५८ जण ठार झाले आहेत.
सदर बस खैबर पख्तुनवा येथून कराचीकडे जात असताना सुक्कूर जिल्ह्य़ातील टेहरीजवळ ट्रकवर आदळली. हा अपघात होताच बसच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्याने बसने पेट घेतला. त्यामध्ये किमान ५८ जण ठार झाले, असे पोलीस अधिकारी अफझल सोमोरो यांनी सांगितले.
या अपघाताची खबर मिळताच मदतकार्य पथकाने मृतदेह नजीकच्या सुक्कूर आणि खैरपूर येथील हॉस्पिटलमध्ये हलविले. या अपघातात जखमी झालेल्या १५ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
बसचालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे. या बसमध्ये क्षमतेहून अधिक म्हणजे ७० प्रवासी होते. मात्र या अपघाताबाबत विविध प्रकारची मते व्यक्त केली जात आहेत. बसचालकाने अन्य वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि बस समोरून वेगाने येत असलेल्या ट्रकवर आदळली, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.तर गाडीत इंधन भरून मुख्य रस्त्यावर बस येत असतानाच वेगाने येणारा ट्रक त्यावर आदळला, असे वाहतूक पोलिसाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2014 1:08 am

Web Title: road accident in south pakistan kills 58 people
टॅग : Bus
Next Stories
1 पर्यटक महिलेवर बलात्कार करून तिची नृशंस हत्या
2 दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा?
3 शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ‘इस्लामिक स्टेट’ची पोस्टर्स
Just Now!
X