News Flash

…ही गोष्ट करोना महामारीपेक्षाही गंभीर; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

४० हजार किमी रस्त्यांचं होणार सेफ्टी ऑडिट

नितीन गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा हवाला देत गडकरी यांनी ही गोष्ट करोना महामारीपेक्षाही गंभीर आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी देशातील ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्गांचा सेफ्टी ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते अपघातांच्या घटनांबाबत काळजी व्यक्त केली. गडकरी म्हणाले,”रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांपैकी १८ ते ४५ या वयोगटातील काम करणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणे ७० टक्के आहे. देशात दिवसाला ४१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही परिस्थिती करोना महामारीपेक्षाही जास्त गंभीर आणि पुढील काळात ही परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते,” असं गडकरी म्हणाले.

“रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारनं आता देशातील ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्गांचा सेफ्टी ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे. या महामार्गांचं ऑडिट करून त्यातील चुका आणि उणीव शोधून काढण्यात येतील. दुरूस्त करण्यात येईल. हे दुर्दैव आहे की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतानंतर अमेरिका आणि चीनचा क्रमाक लागतो. परिवहन मंत्री म्हणून या गोष्टीबद्दल मी खूप संवेदनशील आणि गंभीर आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले.

वाढत्या रस्ते अपघातांवरून गडकरी यांनी डीपीआर (detailed project reports) तयार करणाऱ्यांना फैलावर घेतलं. “अनेक रस्त्यांच्या योजना चुकीच्या आणि सदोष असून, शेकडो तांत्रिक उणीवा देखील आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अपघाताचे स्पॉट तयार होतात. डीपीआर सक्षम प्राधिकरणाकडून तपासले जायला हवेत आणि त्यात बदल केले जायला पाहिजे, तटस्थ एजन्सी आणि शैक्षणिक संस्थांकडून हे बघितले गेलं पाहिजे,” असं गडकरी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 11:56 am

Web Title: road accident situation in country much serious than pandemic says nitin gadkari bmh 90
Next Stories
1 #आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं Top Trending हॅशटॅग; मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याला होतोय विरोध
2 औषधांवरील साडेसहा कोटींचा कर माफ; मुंबईतील चिमुकलीला पंतप्रधान मोदींनी केली मदत
3 दारु माफियाचा पोलिसांवर हल्ला, २४ तासांच्या आत पोलिसांनी केलं एन्काऊंटर
Just Now!
X