News Flash

भारत-चीन सीमेपर्यंत रस्ते बांधणीचे काम सुरु; १८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

भारतमाला योजनेंतर्गत हे रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र

उत्तराखंडमध्ये चीनच्या सीमेपर्यंत १८ हजार कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे जाळे तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. बीआरओचे महानिदेशकांनी याबाबत मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची भेट घेऊन राज्यातून जाणाऱ्या रस्ते उभारणीबाबत चर्चा केली. भारतमाला योजनेंतर्गत हे रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यांचे हे जाळे महत्वाचे आहे. सीमेलगतच्या ग्रामीण भागातील लोक हे आपल्या लष्करासाठी माहितीचे महत्वपूर्ण स्रोत आहेत. तर बीआरओचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह म्हणाले, केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी भारतमाला योजनेंतर्गत १८ हजार कोटी रुपये खर्चुन चीन सीमेपर्यंत रस्त्यांचे जाळे उभारण्यास सुरुवात झाली आहे.

या नियोजित योजनेत बैजनाथ-थराली-कर्णप्रयाग मार्ग, अस्कोट-धारचूला-मालपा मार्ग, कपकोट-मनस्यारी मार्ग, सेराघाट-जौलजीवी मार्ग, माना-मूसा पानी-माणा पास मार्ग आणि जोशीमठ-मलारी मार्ग या मार्गांवर रस्ते बांधणीचे काम होणार आहे. यासाठी भूमी अधिग्रहण आणि वनखात्याकडून परवानगी मिळाल्याबद्दल सिंह यांनी या खात्याचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर या रस्ते उभारणीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

त्याचबरोबर मुख्यमंत्री रावत यांनी बीआरओच्या हरिद्वार रोड प्रकल्प मुख्यालयासाठी २० एकर जमीन उपलब्ध करुन देण्याच्या मागणीवरही गांभीर्याने विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले. राज्यातील सीमाभागात आणि गावांमध्ये रस्त्यांची बांधणी करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 9:01 pm

Web Title: road construction works for india china border expected to spend rs 18 thousand crores
Next Stories
1 निवडणुकीपूर्वीच भाजपाला मिळाला आजपर्यंतचा सर्वांत मोठा निवडणूक निधी
2 शाहरुख खानविरोधात आमदाराची पोलिसांत तक्रार; ‘झिरो’ सिनेमावरुन वाद
3 व्हॉटसअॅपची भुरळ ! किडनी विकून त्याला मिळवायचे होते दिड कोटी…
Just Now!
X