लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील, तर त्यासाठी पैसे मोजावेच लागतील. रस्ते बांधण्यासाठी आवश्यक निधी सरकारकडे नाही. त्यामुळे लोकांना चांगल्या रस्त्यासाठी टोल द्यावाच लागेल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले.
राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी टोल आकारणीसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील, तर त्यासाठी त्यांना पैसे मोजावेच लागतील. देशात रस्ते उभारण्यासाठी आवश्यक निधी सरकारकडे उपलब्ध नाही. त्यामुळे लोकांना टोल द्यावाच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.