तपास सीबीआयकडे सोपविण्याची शिफारस
जामुई जिल्ह्य़ातील जैन मंदिरातून २६०० वर्षांंपूर्वीची भगवान महावीराची मूर्ती चोरीला गेल्याच्या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस बिहार सरकारने केली आहे, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी येथे सांगितले.
राज्य पोलिसांनी या चोरीचा तपास परिणामकारक पद्धतीने केला आहे, मात्र अशा प्रकरणांचा छडा लावण्यात सीबीआय तरबेज असल्याने राज्य सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे, असेही नितीशकुमार म्हणाले. या चोरीप्रकरणी चिंता व्यक्त करून नितीशकुमार यांनी, राज्य सरकार अतिशय मौल्यवान मूर्तीचा शोध घेत असल्याचे सांगितले. गेल्या शुक्रवारी रात्री जैन मंदिरातून या मूर्तीची चोरी झाली होती.