News Flash

रॉबर्ड वढेरा प्रामाणिक, ते ‘भारतरत्न’साठी पात्र: भाजपा

"रॉबर्ट वढेरा हे खरंच प्रामाणिक आहेत. त्यांनी देशाला लुबाडल्याचे मान्य केले आहे"

संग्रहित छायाचित्र

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे व काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर भाजपाने निशाणा साधला आहे. रॉबर्ट वढेरा हे प्रामाणिक असून गांधी कुटुंबासाठीच्या कोट्यानुसार ते भारत रत्नसाठी पात्र ठरले आहेत, असे भाजपाने म्हटले आहे.

काही दिवासंपूर्वी रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. बुधवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. ‘मी या देशात राहतो. ज्यांनी या देशाला लुटले ते देशाबाहेर पळून गेले. त्यांचे काय ?. मी भारत सोडून कधीच जाणार नाही. तसेच माझी चौकशी पूर्ण होईपर्यंत मी सक्रीय राजकारणात देखील येणार नाही हा माझा शब्द आहे’, असे वढेरा यांनी स्पष्ट केले.

भाजपाने ट्विटरवरुन रॉबर्ट वढेरा यांच्यावर निशाणा साधला. रॉबर्ट वढेरा हे खरंच प्रामाणिक आहेत. त्यांनी देशाला लुबाडल्याचे मान्य केले आहे. आता वढेरा हे गांधी कुटुंबासाठीच्या कोट्यानुसार भारत रत्नसाठी पात्र आहेत, असे भाजपाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रॉबर्ट वढेरा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. २००५ ते २०१० या पाच वर्षांत वढेरा यांनी लंडनमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली होती. या मालमत्ता खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 2:43 pm

Web Title: robert vadra is really honest now eligible for the bharat ratna says bjp
Next Stories
1 जैश ए मोहम्मदचे देशात अस्तित्त्वच नाही, पाकच्या उलट्या बोंबा
2 ‘राहुल गांधींचा भारतीय हवाई दलापेक्षा पाकिस्तानवर जास्त विश्वास’
3 फेसबुकवर भाजपा प्रसन्न! एका महिन्यात जाहिरातींवर २. ३७ कोटींचा खर्च
Just Now!
X