21 November 2019

News Flash

प्रियंकाला देशवासियांच्या सेवेसाठी सोपवतो, कृपया त्यांची काळजी घ्या : रॉबर्ट वड्रा

काँग्रेसच्या सरचिटणीसपदी वर्णी लागलेल्या प्रियंका गांधी यांच्या भव्य रोड शोचे आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

काँग्रेसच्या सरचिटणीसपदी वर्णी लागलेल्या प्रियंका गांधी यांच्या भव्य रोड शोचे आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे प्रियंकांची राजकारणातील पर्वाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी आपल्या पत्नीबाबत एक भावनिक पोस्ट फेसबुकवर लिहीली आहे. यामध्ये प्रियंकाला मी देशाच्या सेवेसाठी तुमच्याकडे सोपवत आहे, कृपया त्यांची काळजी घ्यावी, असे त्यांनी भारतीय जनतेला आवाहन केले आहे.

वड्रा आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘आपल्याला उत्तर प्रदेशात काम करण्यासाठी आणि भारतीय जनतेच्या सेवेच्या नव्या प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा. आपण माझी सर्वात चांगली मैत्रीण आहात, एक आदर्श पत्नी आहात आपल्या मुलांसाठी एक चांगली आई आहात. तिकडे खुपच संवेदनशील आणि भ्रष्ट राजकीय वातावरण आहे. मात्र, मला माहिती आहे, लोकांची सेवा करणे तुमचे कर्तव्य आहे, त्यामुळे मी त्यांना भारताच्या लोकांकडे सोपवत आहे. कृपया त्यांना सुरक्षित ठेवा’, अशा स्वरुपाची भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे.

भव्य ‘रोड शो’ने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा यांच्या ‘मिशन यूपी’ मोहिमेला लखनऊमध्ये आजपासून सुरुवात झाली आहे. प्रियंका यांच्या आगमनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया प्रियंका यांच्यासोबत आहेत.

लखनऊ विमानतळ ते काँग्रेस कार्यालय असा १५ किलोमीटरच्या मार्गावर हा रोड शो होत आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे पूर्व तर सिंधिया यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

First Published on February 11, 2019 4:14 pm

Web Title: robert vadra writes on facebook says my best wishes with priyanka gandhi
Just Now!
X