News Flash

करोनावर आता ‘कॉकटेल’ उपचार! एका डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये!

दोन प्रकारच्या अँटिबॉडी इंजेक्शनचं कॉकटेल करून त्याचे डोस रॉश इंडियाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सध्या जगभरात करोनावर प्रतिबंधक उपचार म्हणून लसीकरण केलं जात आहे. मात्र, काही औषधांचा वापर करोनाचा फैलाव नियंत्रित करण्यासाठी केला जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शन करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जात असताना आता त्यासोबतच नवीन कॉकटेल उपचार पद्धती भारतात उपलब्ध होणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर या उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता. Casirivimab आणि Imdevimab या दोन प्रकारच्या अँटिबॉडिजचं कॉकटेल करून हे कॉकटेल इंजेक्शन तयार करण्यात येतं. या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत तब्बल ५९ हजार ७५० रुपये इतकी असल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.

प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस!

रॉश इंडिया या औषध निर्मिती कंपनीने ही दोन्ही अँटिबॉडी असलेली इंजेक्शन्स बनवली आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करोना उपचारांसाठी ही पद्धत वापरण्यात आली होती. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, “दोन्ही इंजेक्शनच्या कॉकटेल पॅकिंगमध्ये कासिरिविमॅब (Casirivimab) आणि इमडेविमॅब (Imdevimab) यांचे प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस आहेत. या प्रत्येक डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये इतकी आहे. या एका कॉकटेल पॅकिंगमधून दोन रुग्णांना डोस देता येऊ शकतील. एका कॉकटेल पॅकिंगची कमाल किंमत १ लाख १९ हजार ५०० इतकी आहेय.”

२ लाख रुग्णांवर उपचार शक्य!

सध्या भारतात या कॉकटेल इंजेक्शनची पहिली बॅच दाखल झाली असून दुसरी बॅच जून महिन्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सिप्ला कंपनीकडून हे कॉकटेल भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या दोन्ही बॅचमुळे जवळपास २ लाख रुग्णांवर उपचार करता येणं शक्य होणार आहे, असं सिप्ला कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कुणासाठी वापरता येणार कॉकटेल इंजेक्शन?

दरम्यान, हे कॉकटेल इंजेक्शन कोणत्या रुग्णांवर वापरता येणार, याविषयी देखील रॉश इंडियाकडून स्पष्टीकरण करण्यात आलं आहे. याचे डोस सौम्य किंवा मध्यम प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना देता येऊ शकतील. १२ वर्षे वयापेक्षा जास्त असणाऱ्या रुग्णांनाच हे डोस देता येतील. त्यासोबत हे डोस देण्यासाठी रुग्णाचं किमान वजन ४० किलो असणं आवश्यक आहे. ज्या रुग्णांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे, अशा रुग्णांना हे इंजेक्शन देता येईल. मात्र, इंजेक्शन देण्यासाठी रुग्ण ऑक्सिजनवर नसावा, असं देखील कंपनीकडून नमूद करण्यात आलं आहे.

Covid 19: सिपला औषध कंपनीचं आरटी-पीसीआर टेस्ट किट आजपासून विक्रीला

करोना गंभीर होण्याचा धोका असणाऱ्या हाय रिस्क रुग्णांना वेळीच हे इंजेक्शन दिल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता कमी होत असून अशा रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण देखील ७० टक्क्यांनी कमी होत असल्याचं दिसून आलं आहे, अशी माहिती एएनआयनं दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 4:01 pm

Web Title: roche india antibody cocktail to treat corona patients used for donald trump pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Toolkit case : दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेसच्या दोन नेत्यांना बजावल्या नोटीसा!
2 भारत वेटिंगवर! फायझर, मॉडर्नाच्या लशींची बुकिंग फुल; भारताला करावी लागणार मोठी प्रतीक्षा
3 Cyclone Yaas : यास चक्रीवादळाचा धामरा बंदरावर होणार लँडफॉल! १२ तास घालणार थैमान!
Just Now!
X