24 February 2021

News Flash

इराकमधील अमेरिकी दुतावासाजवळ रॉकेट हल्ला; इराणवर संशय

इराणच्या सैन्याचे मुख्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांद्वारे ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिका याच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अद्याप मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण, इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पाच रॉकेट हल्ले झाल्याचे वृत्त आहे. रविवारी रात्री हे हल्ले झाले असून त्यामागे इराणचा हात असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अद्याप कोणीही याची जबाबदारी घेतलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बगदादमधील ग्रीन जोन येथील अमेरिकी दुतावासाजवळ दोन रॉकेटद्वारे हल्ला करण्यात आला होता. ग्रीन जोन हा भाग मध्य बगदादमध्ये आहे. या ठिकाणी सरकारी इमारती आणि विविध देशांचे राजकीय दुतावास आहेत. इराणच्या सैन्याचे मुख्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांद्वारे ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिका याच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

दुसरीकडे बगदादमध्ये इराकी सरकारविरोधातील असंतोष शमण्याची चिन्हे नाहीत. इथल्या सरकारची कामाची पद्धत तसेच अमेरिकेचे सैन्य बऱ्याच काळापासून देशात ठाण मांडून बसल्याने अनेक आठवड्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनांमुळे इराकमध्ये सध्या मोठे तणावाचे वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 7:51 am

Web Title: rocket attack near us embassy in iraq suspicion of iran aau 85
Next Stories
1 देशाला सरकारवर लक्ष ठेवणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची गरज -अभिजीत बॅनर्जी
2 Mann ki Baat : हिंसेने कोणताही प्रश्न सुटत नाही -पंतप्रधान मोदी
3 धार्मिक भेदभावाशिवाय ‘त्यांनी’ ५५०० बेवारस मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार; ‘पद्मश्री’नं झाला गौरव
Just Now!
X