28 October 2020

News Flash

आंतराराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे निघालेल्या यानाचं इमर्जन्सी लॅन्डिग

या यानात रशिया आणि अमेरिकेचे दोन अंतराळवीर त्याचबरोबर चालकांच्या टीममधील दोघे असे एकूण चार जण प्रवास करीत होते.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठी रवाना झालेल्या सोयुज नामक अंतराळयानाच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी कझाकस्तानमध्ये लॅन्डिग करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठी रवाना झालेल्या सोयुज नामक अंतराळयानाच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लॅन्डिग करण्यात आल्याचे वृत्त आहे. या यानात रशिया आणि अमेरिकेचे दोघे अंतराळवीर त्याचबरोबर चालकांच्या टीममधील दोघे असे एकूण चार जण प्रवास करीत होते. रशियाच्या वृत्तसंस्थांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.


इंटरफॅक्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, नासाचे सदस्य निक हेग आणि रशियाची अंतराळ एजन्सी एलेक्सी ओवचिनिन हे या यानातून कझाकस्तानमध्ये आपत्कालिन स्थितीत उतरले. या अंतराळ यानातून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांना कुठलीही इजा झालेली नाही. यांपैकी ओवचिनिनची ही दुसरी अंतराळ यात्रा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 5:31 pm

Web Title: rocket carrying two astronauts to international space station makes emergency landing
Next Stories
1 गंगा नदीसाठी १११ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जी.डी. अग्रवाल यांचे निधन
2 आधी ब्रिटिशांनी आपले विभाजन केले आता आपणही तेच करतोय, आनंद महिंद्रा उद्विग्न
3 मैत्रीसाठी कायपण ! हिऱ्यातून येणारे पैसे मित्रासोबत घेणार वाटून
Just Now!
X