News Flash

रोहित शेखर यांची उशीने तोंड दाबून हत्या केल्याचा संशय; तपास CID कडे वर्ग

रोहित शेखर हे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहात होते. रोहित शेखर तिवारी यांचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला.

संग्रहित छायाचित्र

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर तिवारी यांचा गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता रोहित शेखर यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शेखर हे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहात होते. रोहित शेखर तिवारी यांचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. मॅक्स रुग्णालयामध्ये तातडीचा दूरध्वनी आला, त्यानंतर रुग्णवाहिकेतून रोहित शेखर यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच ते मरण पावल्याचे घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.

शवविच्छेदनानंतर रोहित शेखर यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरुन झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालामध्ये काढण्यात आला आहे. हा अनैसर्गिक मृत्यू असून तो मनुष्यवध वर्गवारीतील आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. या आधारे दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सीआयडीकडे सोपवला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात रोहित शेखर यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शेखर यांची पत्नी दिल्लीबाहेर होत्या. शनिवारी सकाळी त्या दिल्लीत आल्या असून त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. त्यापूर्वी पोलिसांनी शुक्रवारी रोहित शेखर यांच्या घरात राहणारे कुटुंबातील अन्य सदस्य आणि घरकाम करणाऱ्या महिलांची चौकशी केली होती.  रोहित शेखर यांच्या निवासस्थानी सात सीसीटीव्ही कॅमेरे होते. त्यापैकी दोन बंद असल्याचे पोलीस तपासातून समोर आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 11:06 am

Web Title: rohit shekhar tiwari death unnatural murder case registered smothered with pillow
Next Stories
1 …तर भाजपाने महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी दिली असती: ओवैसी
2 प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे मोदींकडून समर्थन, म्हणाले अमेठीतील काँग्रेस उमेदवारही जामिनावर बाहेर
3 काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान
Just Now!
X