News Flash

रोहित वेमुला हा दलित नव्हताच – सुषमा स्वराज

दलित प्रकरणावरून या विषयावर जी काही चर्चा सुरू आहे त्याला काही महत्वच नाही.

रोहित वेमुला हा दलित नव्हताच – सुषमा स्वराज
हैदराबाद विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी, रोहित वेमुला हा दलित नव्हताच असा दावा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसापासून रोहितच्या आत्महत्या प्रकरणामुळे केंद्रातील राजकारण प्रभावित झाले आहे. त्यात आता हैदराबाद विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी, रोहित वेमुला हा दलित नव्हताच असा दावा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे.
‘या प्रकरणात जे तथ्य समोर आले आहे आणि जी माहिती मला मिळाली आहे, त्यानुसार रोहित हा दलित नव्हताच. मात्र काही जणांनी त्याला दलित म्हणून या संपूर्ण प्रकरणाला सांप्रदायिक रंग दिला आहे. दलित प्रकरणावरून या विषयावर जी काही चर्चा सुरू आहे त्याला काही महत्वच नाही’ असे स्वराज यांनी म्हटले आहे. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाला आता आक्रमक पवित्रा आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांनी देखील रोहितच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित करत आपला देश कुठे चालला आहे असे विचारले आहे. शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे एक दिवसाच्या उपोषणावर बसले होते. त्यांच्या या दौऱ्याला अभाविपने विरोध केला होता.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ठेवत रोहितसह पाच दलित विद्यार्थ्यांवर ऑगस्ट २०१५ मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्याच नैराश्यातून रोहितने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. रोहितच्या आत्महत्येपासून दोषींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2016 11:27 am

Web Title: rohith vemula was not a dalit says sushma swaraj
टॅग : Dalit,Sushma Swaraj
Next Stories
1 संघाची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न!
2 पेट्रोल, डिझेल अबकारी शुल्कात वाढ
3 हिलरी यांच्या सात ई मेल मालिका रोखल्या
Just Now!
X