News Flash

लिपूलेख पासवरुन भारत-नेपाळमध्ये तणाव, लष्करप्रमुखांचा चीनकडे इशारा

भारताने लिपूलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. त्यावरुन सध्या भारत आणि नेपाळमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे.

भारताने लिपूलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. त्यावरुन सध्या भारत आणि नेपाळमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख हा ८० किलोमीटरचा मार्ग आठ मे रोजी सुरु झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे.

भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या या मार्गावर आता नेपाळने आक्षेप घेतला आहे. ‘नेपाळने कुणाच्यातरी सांगण्यावरुन हा आक्षेप घेतलाय’ असे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे शुक्रवारी म्हणाले. नेपाळच्या या आक्षेपामागे चीन असल्याचे संकेत त्यांनी दिले. ‘लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळचे अविभाज्य अंग असून ते परत मिळवण्यासाठी राजनैतिक पावलं उचलू’ असा इशारा नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्या देवी भंडारी यांनी दिला आहे.

संसदेत आपल्या सरकारची धोरण आणि कार्यक्रम त्यांनी मांडला. त्यावेळी नवीन नकाशा जारी करुन लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये दाखवू असं विद्या देवी भंडारी यांनी म्हटलं आहे. “नेपाळच्या राजदूताने काली नदीच्या पूर्वेकडचा भाग त्यांचा आहे असं म्हटलं आहे. खरंतर त्यामुळे वादाचा विषयच नाहीय. कारण आपण नदीच्या पश्चिमेकडे रस्ता बांधला आहे. त्यामुळे ते आंदोलन कशासाठी करतायत ते समजत नाहीय. यापूर्वी कधी यावरुन वाद झाले नाहीयत” असे नरवणे म्हणाले.

मनोहर पर्रिकर इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनलिसिसने आयोजित केलेल्या वेब संवादामध्ये ते बोलत होते. लिपूलेख पासच्या रस्त्यावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. त्यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. ‘नेपाळने कोणाच्यातरी सांगण्यावरुन आक्षेप घेतला असावा, ती शक्यता जास्त दिसतेय’ असे नरवणे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 2:46 pm

Web Title: row between india nepal over lipulekh pass army chief sees hand of third party dmp 82
Next Stories
1 ‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ८०० कोटींची गुंतवणूक
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजवर पुनर्विचार करावा – राहुल गांधी
3 Auraiya Accident: एक कप चहामुळे वाचले अनेक मजुरांचे प्राण
Just Now!
X