News Flash

आरपीएफ जवानाच्या हातातून बंदूक पडली आणि घात झाला….

आरपीएफ जवानाच्या हातातून चुकून बंदूक खाली पडून झालेल्या गोळीबारात नऊ वर्षाचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे

आरपीएफ जवानाच्या हातातून चुकून बंदूक खाली पडून झालेल्या गोळीबारात नऊ वर्षाचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. कोलकातामदील दम दम मेट्रो स्टेशनवर ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चुकून सुटलेली ही गोळी लागून मुलाची आईदेखील जखमी झाली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरपीएफ जवान आपलं पाकिट उचलण्यासाठी खाली वाकला असता त्याची सेल्फ लोड असलेली रायफल खाली पडली. रायफल खाली पडल्यानंतर त्यातून गोळी सुटली जी थेट तिथे जवळच उभ्या असलेल्या नऊ वर्षीय मुलाला आणि त्याच्या आईला लागली.

गोळी लागल्याने मुलाच्या पायाला जखम झाली असून, महिलेच्या हाताला जखम झाली आहे. त्यांना जवळच्याच आर जी गौर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पोलिसांनी आरपीएफ जवानाची चौकशी केली आहे. सोबतच नेमकं काय झालं होतं याची चाचपणी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 5:06 am

Web Title: rpf jawan dropped rifle by mistake shot 9 year old
Next Stories
1 ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर, सातपैकी पाच खासदार महाराष्ट्राचे
2 काश्मीरला भारताचा भाग दाखवणाऱ्या पुस्तकावर पाकिस्तानने घातली बंदी
3 मनुष्याची हत्या करेल असं कोणतंही तंत्र विकसित करणार नाही – गुगल
Just Now!
X