पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. या आंदोलनावरून सध्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी नेते या आंदोलनासाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरत आहेत, तर विरोधी पक्षातील नेतेमंडळी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना दिसत आहेत. या साऱ्या प्रकरणावर केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना एक महत्त्वाचे विधान केले.

“राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आणि निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे. पण मी सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतीविषयक जे तीन नवे कायदे पारित केले आहेत, त्या कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. पण जर हे कायदे रद्द केले तर मात्र शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होईल, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. एखाद्या आंदोलनावर तोडगा निघण्यासाठी दोन्ही बाजूच्या लोकांनी बसून चर्चा करणं आवश्यक असतं. मोदी सरकारमधील मंत्री सकारात्मक दृष्टीकोन ठेवून चर्चा करण्याची तयारी दाखवत आहेत पण शेतकरी आंदोलनातील नेतेमंडळींना मात्र हे आंलोन लावून धरायचे आहे, म्हणूनच कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील या सरकारच्या आश्वासनानंतरही ते यावर तोडगा काढण्यास तयार नाहीत, अशी टीकादेखील आठवले यांनी केली.

पंतप्रधान मोदी मुकेश अंबानींच्या नातवाला पाहायला हॉस्पिटलमध्ये? जाणून घ्या सत्य…

दरम्यान, याच आंदोलनाबाबत कुस्तीपटू बबिता फोगाटने वादग्रस्त ट्विट केलं होतं. “आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील नेतेमंडळी कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाहीत”, असे ट्विट तिने केले होते.