News Flash

अम्फान चक्रीवादळ : पश्चिम बंगालला १ हजार कोटींची तात्काळ मदत; पंतप्रधानांची घोषणा

त्यांनी जखमींना आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.

एकीकडे देशभरात करोनानं थैमान घातलं असतानाच पश्चिम बंगाल आणि ओडिशावर अम्फान चक्रीवादळाचं संकट कोसळलं होतं. यानंतर तब्बल ८३ दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा आपला पहिला दौरा केला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालला १ हजार कोटी रूपयांची तात्काळ मदत देण्याची घोषणा केली. तसंच या चक्रीवादळामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज पश्चिम बंगालचा दौरा केला. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली. तसंच पश्चिम बंगालला १ हजार कोटी रूपयांची तर मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख आणि गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना १ लाख रूपयांची तात्काळ मदत जाहीर केली. दरम्यान, केंद्र सरकारची एक टीम पश्चिम बंगलच्या दौऱ्यावर जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही टीम त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करेल आणि राज्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील त्यांच्यासोबत होत्या. दोघांनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं हवाई पाहणी केली. अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाचा दौराही करणार आहेत.

पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता जमिनीला स्पर्श केला, त्यानंतरच्या झंझावातात अनेक झाडे, घरे उन्मळून पडली. तसंच अनेक ठिकाणी विद्युत खांबही कोसळले होते. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाल्याची नोंद करण्यात आली होती. चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ४१ तुकड्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तैनात करण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 2:26 pm

Web Title: rs 1000 crore allocated by central government for immediate assistance of west bengal in the wake of cyclone amphan pm narendra modi jud 87
Next Stories
1 Amazon स्विगी, झोमॅटोच्या तोंडचा घास पळवणार?; आता थेट घरपोच जेवणही देणार
2 थरारक ! गर्भवती महिलेला नेत असतानाच सिंहांनी अडवला रस्ता, त्यानंतर घडलं असं काही….
3 करोना, चक्रीवादळानंतर आता टोळधाडींचे संकट; मध्य प्रदेशमधील १५ जिल्ह्यांमधील शेतकरी हैराण
Just Now!
X